Raj Thackeray : मनसे महायुतीत सामिल होणार का? फडणवीसांचे संकेत; म्हणाले, राज ठाकरे पहिले व्यक्ती...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत समाविष्ट होणार का? या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या.
 Raj Thackeray devendra Fadnavis
Raj Thackeray devendra Fadnavis esakal

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत समाविष्ट होणार का? या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या. राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतल्यानं या चर्चेला उधाण आलं होतं. त्याचबरोबर मनसेला मुंबईतील एक लोकसभेची जागा दिली जाईल असंही बोललं जात होतं.

पण त्यानंतर ही चर्चा थंड पडली होती. पण आता पुन्हा एकदा मनसे महायुतीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. (Raj Thackeray MNS would Join Mahayuti Devendra Fadnavis gives hint at nagpur)

 Raj Thackeray devendra Fadnavis
Stalin Youtuber Row: CM स्टॅलिन यांच्यावर टीका करणाऱ्या युट्यूबरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! कोर्टानं म्हटलं, निवडणुकीच्या तोंडावर...

फडणवीस म्हणाले, "मनसेशी गेल्या काही काळात चर्चा झालेल्या आहेत. विशेषतः मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीकता वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की राज ठाकरे हे असे पहिले व्यक्ती होते की, त्यांनी २०१४ साली मोदींचं कौतुक केलं होतं आणि जाहीर भूमिका घेतील होती की, मोदींना पंतप्रधान बनवलं पाहिजे. मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. (Latest Marathi News)

 Raj Thackeray devendra Fadnavis
Sangli Loksabha: सांगलीत मविआचा उमेदवार सेनेचा असणार की काँग्रेसचा? उद्या होणार फैसला

पण मला असं वाटतं की, आज दहा वर्षात मोदींनी भारताचा विकास केला. नव्या भारताची निर्मिती झाली. त्यामुळं सर्वांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. जे लोक राष्ट्रभावनेनं प्रेरित आहेत त्या सर्वांनी मोदींसोबत राहिलं पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं राज ठाकरे आणि त्यांची मनसे ही मोदींसोबत राहिल. मोदींचा त्यांना पाठिंबा असेल. त्यांना आता निर्णय घ्यायचा आहे. पण माझी त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com