"चुंबन घेणं अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही"; आरोपीला हायकोर्टाकडून जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai high court

"चुंबन घेणं अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही"; आरोपीला हायकोर्टाकडून जामीन

मुंबई : चुंबन घेणे हा अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार ओठांवर चुंबन घेणे आणि प्रेम करणे हा अनैसर्गिक गुन्हा नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवत आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.

(Bombay HC Grants Bail to POCSO Accused, Says Kissing Prima Facie Not Unnatural Sex)

यासंदर्भात मागच्या वर्षी फिर्यादीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. १४ वर्षीय मुलाच्या वडिलांना त्यांच्या कपाटातून काही पैसे गायब असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर त्यांच्या मुलांने त्यांना सांगितलं की, ऑनलाईन गेमच्या दुकानात रिचार्जसाठी त्याने हे पैसे आरोपीला दिले होते. तो सारखा त्याच्या दुकानात ऑनलाईन गेमच्या रिचार्जसाठी जात असे आणि यावेळी त्याने आपले चुंबन घेऊन गुप्तांगांना स्पर्श केला. असं मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं.

मुलाने ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर POCSO कायदा आणि कलम 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीने कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज कोर्टाने निकाल दिला आहे.

हेही वाचा: पाकिस्तानात 2 शीख व्यक्तींची हत्या; अकाली दलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

दरम्यान न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की, "फिर्यादीचे विधान आणि एफआयआर असं सुचित करतात की, आरोपीने फिर्यादीच्या खासगी भागाला स्पर्श करत चुंबन घेतलं होतं. माझ्या मते, हे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा ठरणार नाही." असं न्यायमुर्ती प्रभुदेसाई यांनी म्हटलं आहे. "गुन्हा दाखल केल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत मुलावर झालेल्या लैंगिक आत्याचाराची पुष्टी झाली नाही. त्यामुळे एका वर्षानंतर आरोपीला जामीन मिळण्याचा हक्क आहे." असं सांगत न्यायमूर्तीं प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा: मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाली; ३ जण सुखरुप बाहेर

आयपीसी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला जामीन मिळणे कठीण असते आणि या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान या प्रकरणात आरोपीला ३० हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Kissing Fondling Not Unnatural Offence Grants Bail High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top