Gateway of India: गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात 'या' मराठी व्यक्तीचा मोलाचा वाटा, वाचा इतिहास

मुंबईची ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन ४ डिसेंबर १९२४ ला करण्यात आले होते. याच्या उभारणीत एका मराठी इंजिनिअरचा मोठा वाटा होता.
Gateway of India
Gateway of IndiaSakal
Updated on

Gateway of India History: स्वप्नांचं शहर, कधीही न थांबणार, न झोपणारं शहर अशी अनेक विशेषणं मुंबई या शहराला लावली जातात. अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत हे शहर आजही स्वतःचा एक वेगळेपणा घेऊन ठामपणे उभे आहे. वेगवेगळ्या बेटांनी मिळून बनलेल्या या शहराचा इतिहास जेवढा भव्य-दिव्य आहे, तेवढीच येतील पर्यटनस्थळं देखील. एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजी अली, कमला नेहरु उद्यान, राणीची बाग अशा अनेक स्थळांना पर्यटक भेट देत असतात. मात्र, यात सर्वात लक्षणीय ठरते ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया.

एकेकाळी भारताचे प्रवेशद्वारे असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचे आजच्याच दिवशी ४ डिसेंबर १९२४ ला उद्घाटन करण्यात आले होते. भारतीय असो अथवा परदेशी व्यक्ती मुंबईला येणारी प्रत्येक व्यक्ती गेटवे ऑफ इंडियाला भेट देतेच. जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले, ब्रिटिश राजवटीच्या खुणा दर्शवणारे गेटवे ऑफ इंडिया आजही प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र आहे.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी उभारण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास जाणून घेण्यासाठी जवळपास १०० वर्ष मागे जावे लागते. भारताचा इतर देशांशी व्यापार हा मुंबईच्या याच बंदरातून होत असे. मात्र, गेटवे ऑफ इंडिया उभारण्याची कल्पना सर्वात प्रथम समोर आली ती म्हणजे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांच्या भारत भेटी दरम्यान. स्वतः ब्रिटनचा सम्राट भारत भेटीवर येणार म्हणजे त्याचे स्वागत देखील तेवढेच थाटामाटात होणे गरजेचे होते. यातूनच गेटवे ऑफ इंडियाची कल्पना समोर आली.

वर्ष १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदर येथे गेटवे ऑफ इंडियाची कमान उभारण्यात आली. मात्र, ही स्वागत कमान तात्पुरत्या स्वरुपाची होती. त्यानंतर हळूहळू बांधकाम करत अखेर तत्कालीन व्हाइसरॉय अर्ल ऑफ रीडिंग यांच्या हस्ते ४ डिसेंबर १९२४ ला गेट वे ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले.

Gateway of India
Nambi Narayanan: कोण आहेत नंबी नारायणन? पाकला गुप्त माहिती पुरवल्याचे का लागले होते आरोप? जाणून घ्या

मराठी इंजिनअरचा महत्त्वाचा वाटा

गेटवे ऑफ इंडिया हे खास इंडो सारॅसीनिक स्टाइलमध्ये उभारण्यात आले आहे. पिवळ्या बेसाल्ट खडकांनी याची उभारणी करण्यात आली आहे. याची कमान जवळपास ८५ फूट उंच आहे. त्याकाळी याच्या उभारणीसाठी जवळपास २१ लाख रुपये खर्च आला होता. विशेष म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीत रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई या मराठी इंजिनअरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. देसाई यांनी आपल्या घराच्या आवारातच या स्मारकाची प्रतिकृती देखील उभारली होती. ब्रिटिश वास्तुकार जॉर्ज विटेट यांनी याचे डिझाइन केले होते.

याची निर्मितीच भारताचे प्रवेशद्वारे म्हणून झाली होती. जेव्हा इंग्रजांनी भारत सोडला, त्यावेळी त्यांचे अखेरचे जहाज येथूनच रवाना झाले. आज ब्रिटिश जाऊन जवळपास ७५ वर्ष झाली. तरीही गेटवे ऑफ इंडिया आजही मुंबईतील आकर्षणाचे केंद्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com