Lok Sabha Election: भाजपने केलेल्या या चुकांचा काँग्रेस आणि मित्र पक्षांना झाला फायदा

BJP Vs Congress In Loksabha 2024: या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतःकडे कमी जागा ठेवून मित्र पक्षांना अधिकच्या जागा दिल्या.
 भाजपने केलेल्या या चुकांचा काँग्रेस आणि मित्र पक्षांना झाला फायदा
Lok Sabha Election:sakal
Updated on

लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागला. या निवडणुकीत यश काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना मिळालं आहे.तर भाजपला धक्का लागला. या निवडणुकीच्या निकालाने सर्वच एक्झीट पोलचे अंदाज खोटे ठरवत काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना भरभरून यश मिळाल. (lok sabha elections in india 2024)

त्यातही काँग्रेसला मिळालेल यश हे गेल्या वेळेच्या तुलनेत खूप जास्त आहे.काँग्रेसला देशामध्ये 99 जागा मिळाल्या, तर महाराष्ट्रामध्ये 13 जागा मिळाल्या.या मागचं मूळ कारण म्हणजे राहुल गांधी.

 भाजपने केलेल्या या चुकांचा काँग्रेस आणि मित्र पक्षांना झाला फायदा
Mumbai News: मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

मात्र गांधींना नक्की यश का मिळालं? याविषयी काही राजकीय विश्लेषकांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतःकडे कमी जागा ठेवून मित्र पक्षांना अधिकच्या जागा दिला. यावेळी त्यांनी आपल्या मित्र पक्षांना जास्त मान दिला. त्याचा फायदा सर्वांना एकत्रित करण्यात झाला.मात्र भाजप स्वत:चा पक्ष वाढवत राहीला आणि याचा जनमतात विपरीत परिणाम झाला.

परिवार वादाला टार्गेट

या संपूर्ण निवडणुकीत पाहायला गेलो तर राहुल गांधी .वि. नरेंद्र मोदी असा सामना कधी झालाच नाही. हा सामना झाला तो थेट मोदी विरुद्ध जनता असाच. मोदी गरिबांच्या विरोधात काम करतात असा संदेश काँग्रेस आणि मित्र पक्षने दिला. तर दुसरेकडे भाजपा केवळ गांधी परिवाराला आणि परिवार वादाला टारगेट करत राहिली असेच पाहिला मिळाले

४०० पारचा नारा

भारतीय जनता पक्षाने आत्मविश्वास दाखल ४०० पारचा नारा दिला. मात्र तोच त्यांचा अंगलट आला. कारण याचा फायदा विरोधकांनी घेत मोदी सरकार है लोकशाही विरोधी आहे असा प्रचार केला. इतक्या राक्षसी बहुमताची गरज काय ? असा सवाल विरोधकांनी नागरिकांच्या मनात बिंबवला. ज्याचा फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेसने केलेल्या प्रत्येक आरोपाला प्रत्येक दाव्याला भारतीय जनता पक्ष उत्तर देत गेली.याचा तोटा भाजपला झाला.

 भाजपने केलेल्या या चुकांचा काँग्रेस आणि मित्र पक्षांना झाला फायदा
Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपची रणनीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com