Kolhapur Riots: निवडणुकीच्या आधी कोल्हापूरात दंगल भडकवली जातीय का ? 2009 ची पुनरावृत्ती ?

Kolhapur Band news: अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला.
kolhapur bandh election politics
kolhapur bandh election politics

Kolhapur News: अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. kolhapur bandh election politics

या सर्व घटना पाहता जनतेच्या मनात एकच भिती निर्माण होतीय. निवडणुकीच्या आधी कोल्हापूरात दंगल भडकवली जातीय का ? 2009 ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

2009 सालची मिरज दंगल

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 2009 साली गणोशोत्सवादरम्यान जातीय दंगली उसळल्या होत्या. अफझलखानाच्या वधाचे पोस्टर फाडल्यावरुन ही दंगल उसळली होती. या दंगलीनंतर पोलिसांनी विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते.

पोलिसांनी दगडफेक, जळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच चिथावणीखोर भाषण देणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली होती. या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने एकूण 106 जणांची निर्दोष मुक्तता केली.

नेमकं घडलं काय होतं?

मिरज शहरा मध्ये 2009 साली गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाचा फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होतं. (Latest Marathi News)

या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. पंधरा दिवस मिरज-सांगली शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती.

या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ही दंगल 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी झाली. त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीत दंगलीचे प्रत्यंतर पहायला मिळाले. सांगली, मिरज, जत, इचलकरंजी, हातकणंगले या विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा पराभव करत सेना- भाजप पक्षांचे आमदार निवडून आले. धार्मिक दंगल झाली की, त्याचा परिणाम निवडणुकांवर होतो असे निदर्शनास आले. (Latest Marathi News)

2019 नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थिती

2019 नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थिती संपुर्ण बदलली असल्याचे पाहायाला मिळाले. २०१४ ला लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवारांच्या शब्दाखातर आघाडी धर्म पाळत सतेज पाटलांनी धनंजय महाडिकांना पाठिंबा देत विजयात हातभार लावला.

पण विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांविरोधात अमल महाडिक रणांगणात उतरले. २०१४ ला मोदी लाटेत अमल महाडिकांनी विजय मिळवला. त्यामुळे २०१५ च्या विधानपरिषद निवडणुकीत अमल महाडिकांचे वडील महादेवरावांना धूळ चारत सतेज पाटलांनी पराभवाचा वचपा काढला.

लोकसभेला धनंजय महाडिकांना सहकार्य करण्याच्या बदल्यात सतेज पाटलांनी विधानसभेला मदत करण्याची अट टाकली होती. पण महादेव महाडिकांनी शब्द पाळला नाही, त्यामुळे सतेज पाटलांच्या वर्मी घाव लागला. याचाच बदला घेण्याचं सतेज पाटलांनी ठरवलं.

महादेवराव महाडिकांना विधानपरिषदत पराभूत केल्यानंतर आमचं ठरलंय हा पॅटर्न राबवला. २०१९ च्या लोकसभेला धनंजय महाडिकांचा आणि विधानसभा निवडणुकीत अमल महाडिकांचा पराभव घडवून आणला. (Marathi Tajya Batmya)

त्यानंतर कोल्हापूर महापालिका, जिल्हा बॅंक आणि गोकूळमधील महाडिकांचं वर्चस्व मोडित काढलं. त्यापाठोपाठ कारखानाही ताब्यात घेण्यासाठी सतेज पाटील सरसावले होते. 

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असो किंवा कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक सतेज पाटलांनी कोल्हापूरच्या राजकारणात आपला वरचष्मा कायम राखला आहे.

भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या जिल्ह्यात धनंजय महाडीक वगळता भाजप नाममात्र उरलेली नाही. कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने कोल्हापुरात आपला गड मजबूत केला आहे आणि याचे प्रमुख शिलेदार आहेत सतेज पाटील.   (Latest Marathi News)

यासर्व घडामोडी पाहाता आणि सध्याची कोल्हापुरमधील परिस्थिती पाहता राजकीय कारण असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक कंबर कसत आहे. राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पक्ष संघर्ष करत आहे. यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.

अशातच, गेल्या काही दिवासांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडताना दिसत आहे. या घटनांवर भूमिका मांडताना विरोधक नेते सत्ताधांऱ्यांना जबाबदार धरत आहेत. तर सत्ताधारी परिस्थीती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसतात.(Marathi Tajya Batmya)

विशेष म्हणजे कोल्हापुरात झालेल्या घटनेपुर्वी मागील महिन्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका व्यक्त केली होती.

त्यानंतर काल शिवराज्यभिषेक दिनी काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संशयाची सुई अप्रत्यक्षपणे सतेज पाटलांकडे टोकावली आहे.

या दंगली प्रामुख्याने हिंदू विरुध्द मुस्लीम अशा आहेत आणि अशा दंगली उसळल्या की त्यानंतरच्या बंदमध्ये, तक्रारी नोंदण्यामध्ये, शांतता प्रस्थापित करण्याच्या बहाण्याने घटनास्थळी येऊन शांतता बिघडवण्यामध्ये राजकीय पक्षांचे पुढारी आघाडीवर असल्याचे दिसले आहे आणि नेहमी असेच घडत असते.

दंगलीमुळे जे जातीय ध्रुवीकरण होते त्याचा फायदा उठवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांचे पुढारी करत असतात. सतेज पाटील हे कोल्हापूरमध्ये प्रमुख नेते आहेत. त्यांना अशी शंका आली होती तर पोलिसांना शिवराज्यभिषेक दिनी  का सतर्क केलं नाही? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com