विजयी झाल्यास कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही- करुणा शर्मा

महाराष्ट्रात नव्हे देशात कोणत्याच आमदाराने असे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही-करुणा शर्मा
Karuna Sharma
Karuna SharmaEsakal
Updated on

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून आज करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही (Affidavit) माध्यमांसमोर दाखविले. या प्रतिज्ञापत्रातमध्ये त्यांनी मी विजयी झाल्यानंतर पुढील पाच वर्षात स्वतःच्या किंवा मुलांच्या नावे कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही. तसेच मला मिळणारी दोन लाख रुपयाची सॅलरी (पगार) याच उत्तर विधानसभा मतदारसंघात खर्च केली जाईल. तसेच तो खर्च फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमातून जनतेसमोर ठेवला जाईल असा दावा त्यांनी केला आहे. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात नव्हे देशात कोणत्याच आमदाराने असे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही असाही दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. (Kolhapur North Election 2022 )

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज का दाखल करीत आहात या विषयावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, कोल्हापुरात घराणेशाही आहे. गेले कित्येक वर्षांपूर्वीपासून रस्ते आहेत तेच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा तेच आहेत आणि महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहे.

Karuna Sharma
कोल्हापूर उत्तरची निवडणूक रंगणार; करूणा शर्मा रिंगणात

तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का या प्रश्नावर करुणा शर्मा म्हणाल्या, खोट्या केसेस दाखल करून मला जेलमध्ये ही टाकले होते. त्यामुळे दबावाला मी घाबरत नाही. महाराष्ट्रातील, देशातील सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करताना पुणे, बीड पासून महाराष्ट्रातील सर्व भागातील कार्यकर्ते माझ्यासोबत आले आहेत. प्रचाराचे पुढील नियोजन कसे आहे याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या अजून नियोजन झालेले नाही आज होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

High Alert in Hadapsar: Timer Bomb Found Inside Private Hospital Bathroom
Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
Mumbai High Court
Marathi News Esakal
www.esakal.com