Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

Kolhapur Loksabha 2024: कोल्हापूरचा तांबडा पांढरा भारी... कोल्हापूरच राजकारण देखील भारी...येथील राजकारण कुस्तीसारखं आहे. येथे कोण जिंकणार यापेक्षा कोण कुणाला पाडणार, हा महत्वाचा मुद्दा आहे.
Kolhapur Loksabha 2024|Kolhapur Politics
Kolhapur Loksabha 2024|Kolhapur PoliticsEsakal

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा सर्वाधिक चर्चेच आहे. येथून शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपति शाहू महाराज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

कोल्हापूरचा तांबडा पांढरा भारी...कोल्हापूरच राजकारण देखील भारी...येथील राजकारण कुस्तीसारखं आहे. येथे कोण जिंकणार यापेक्षा कोण कुणाला पाडणार, हा महत्वाचा मुद्दा आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणावर सकाळचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले यांनी विश्लेषण केलं आहे. (Kolhapur Loksabha 2024 Shahu Maharaj vs Sanjay Mandlik)

सकाळ, कोल्हापूरचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभू1मीवर कोल्हापुरच्या राजकारणाचा 20 वर्षांचा इतिहास मांडला. यामध्ये चौगुले यांनी माजी खासदार शदाशिवराव मंडलिक, सतेज पाटील, धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्याविषयी विश्लेषण केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही उमेदवार शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक हे तगडे उमेदवार आहेत. दोघांकडे सारखीच ताकद आहे. मात्र येणारे दहा दिवस महत्वाचे आहेत. आता मतदारांवर कोण प्रभाव पाडणार हे महत्वाचे आहे.
निवास चौगुले, मुख्य प्रतिनिधी सकाळ, कोल्हापूर

कोल्हापूरात कोणाला विजयी करायचे यापेक्षा कोणाला पाडायचे हे आगोदर ठरवले जाते. 1999 पासून आजपर्यंत याच विचारातून मतदान झाल्यामुळे आणि हाच ट्रेंड कायम राहिल्यामुळे येथून कायम धक्कादायक निकाल पाहायला मिळतात, असे निवास चौगुले म्हणाले.

पुढे चौगुलेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील नाट्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, 2014 मध्ये मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादीचा खासदार विजयी झाला. कारण लोकांना त्यावेळी संजय मंडलिकांना धडा शिकवायचा होता.

दुसरीकडे 2019 मध्येही आपल्याला धक्कादायक निकालच पाहायला मिळाला. कारण पक्ष आणि कार्यकर्त्याशी नाळ तुटल्याने त्यांच्या विरोधात संताप होता. ते पक्षाच्या विरोधात काम करायचे आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्यात आणि सजेत पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता, असे निवास चौगुले यांनी सांगितले.

महाडिक-पाटील संघर्षाची सुरुवात

यावेळी राज्यभर चर्चेचा विषय असणाऱ्या महाडिक-पाटील संघर्षावरही निवास चौगुले यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आला प्रचंड राजकीय वैर निर्माण झाले आहे. कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी महाडिकांना बिनशर्त पाठिंबा देत आपल रसद पुरवली. व त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, पुढे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून धनंजय महाडिक यांच्या चूलत बंधू अमल महाडिक यांनी परभव केला.

लोकसभेला मदत करुनही विधानसभेत महाडिकांनी आपला पराभव केल्याची सल सतेज पाटील यांना आजही आहे. आणि म्हणून 2014 पासून कोल्हापूरातील कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये महाडिक-पाटील आमने-सामने असतात. त्यामुळे यंदाही प्रतिस्पर्धी शाहू महाराज आणि संजय मंडलिक असले तरी, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचीच प्रतिष्ठा पणाला लागले आहे, असे सकाळचे कोल्हापूर प्रतिनिधी निवास पाटील यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com