

Diwali Special Railway Service
ESakal
चिपळूण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरूवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शनदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वेमुळे कोकणातील प्रवाशांना दक्षिण भारतासह गोवा आणि राजस्थानच्या दिशेने प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.