Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज, प्रशासनाने आखली भन्नाट योजना
Monsoon Update: दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. यंदाही या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण पावसाळा काळ लक्षात घेता सुरक्षेची सर्वंकष योजना आखली आहे.
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर सरासरी ४ हजार मिमीहून अधिक पाऊस पडतो. यामुळे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देऊन साधारण तीन महिन्यांआधी पावसाळीपूर्व कामांना सुरुवात होते. पावसाळापूर्व अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यावर यंदा देखील कोकण रेल्वेने भर दिला आहे.