

Konkan Railway New Number
ESakal
महाड : रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे क्रमांक तसेच प्रवर्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित गाड्यांचे जुने क्रमांक बदलून नवीन क्रमांक देण्यात येणार असून, काही गाड्यांचे सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस असे वर्गीकरणही बदलण्यात येणार आहे. हे बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.