esakal | कोपर्डी अत्याचार : मुंबई HC सुनावणीबाबत विशेष सरकारी वकिलांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

KOPERDI

कोपर्डी अत्याचार : मुंबई HC सुनावणीबाबत माहिती समोर

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) कोपर्डी (Kopardi) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार (Abuse of a Minor Girl) व खून खटल्याची सुनावणी (Hearing) आज (ता.४) सोमवार मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव (Justice Sadhana Jadhav in the Mumbai High Court) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांच्यासमोर होणार होती. मात्र या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विशेष सरकारी वकीलांनी नुकतीच माहिती दिली आहे

विशेष सरकारी वकीलांची माहिती

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे आपण बाजू मांडणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव (Public Prosecutor Umesh Chandra Yadav) यांनी दिली होती. मात्र प्रकरण तांत्रिक कारणामुळे खटला चालविण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. त्यामुळे ही सुनावणी तहकुब करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता दुसऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती यादव-पाटील यांनी दिली.

हेही वाचा: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत, 'SC'चा निर्णय

औरंगाबाद खंडपीठात आरोपींच्या फाशी निश्चितीकरणाचा अर्ज

कोपर्डी (Kopardi) येथील अत्याचार आणि खून प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (The accused were sentenced to death) सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्‍चितीकरण्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठ (Aurangabad Bench) येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे, यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) अपील दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी औरंगाबाद खंडपीठ (Aurangabad Bench) येथे होऊन यातील आरोपी भवाळ याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात आले होते.

हेही वाचा: शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत; मुख्यमंत्र्यांचं काळजीचं आवाहन

दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे

आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) येथे स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण औरंगाबादहुन मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती. औरंगाबाद येथे प्रलंबित असणारे आरोपी भवाळचे अपील त्याचप्रमाणे राज्य शासनाने दाखल केलेले फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणाचे अपील ही दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे (Mumbai High Court) वर्ग करण्यात आली आहे. तसेच आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक तीन नितीन भैलुमे यांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) फाशीच्या शिक्षेविरूद्ध अपील दाखल केली आहेत. या तिन्ही प्रकरणाची त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार होती.

loading image
go to top