esakal | आता शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत; मुख्यमंत्र्यांचं सर्वांना काळजीचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत; मुख्यमंत्र्यांचं काळजीचं आवाहन

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळं गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून (४ ऑक्टोबर) सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "आता उघडलेल्या शाळा आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत, असा निर्धार करुन पुढच्या आयुष्याला सुरुवात करुयात"

हेही वाचा: लखीमपूर - ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा ऐकायला येणार आहे, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस हा खूप भारलेला असतो, त्याचा पुनःप्रत्यय विद्यार्थ्यांना येत आहे. मात्र, आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळ सुरु आहे. आज शाळेचं दार उघडलंय हे आपल्या भविष्याचं आणि विकासाचं दार असून हा निर्णय घेणं खूपच अवघड होतं, यासाठी वारंवार टास्कफोर्सच्या सूचनांचं पालन करावं लागलं.

हेही वाचा: पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ! PM इम्रान खान अडचणीत

पालकांना आणि शिक्षकांना केलं आवाहन

  1. आपल्या पाल्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  2. कोणत्याही शिक्षकाला वाटलं की त्यांना थोडसं बरं वाटत नाहीए तर न घाबरता न डगमगता त्यांनी कोविडची टेस्ट करुन घेणं गरजेचं आहे.

  3. विद्यार्थ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे कारण अजूनही साथीचे आजार घेऊन येणारा पावसाळा संपलेला नाही.

  4. शिक्षणाची जागा अर्थात वर्ग खोल्या बंदिस्त असता कामा नयेत त्याची दारं-खिडक्या खुल्या असाव्यात याची खात्री बाळगायला हवी.

  5. वर्गांमध्ये बसताना प्रत्येक विद्यार्त्यांमध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे.

  6. विद्यार्थ्यांना मास्क वापरायला सांगण ही मोठी कसोटी असली पालकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे.

  7. शाळांच्या स्वच्छता गृहांची स्वच्छता राखणं गरजेचं आहे.

हेही वाचा: 'मृत्यू झालेल्या 4 भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मिळावेत'

करोनानी आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन आपलं पुढचं आयुष्य आनंददायी व्हावं ही सदिच्छा. सर्व विद्यार्थ्यांना-पालकांना आणि शिक्षकांना मनपुर्वक शुभेच्छा देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आजच्या दिवशी सर्वांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

loading image
go to top