
koyna dam
esakal
Killari Earthquake: लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी भूकंपाच्या कटू आठवणींना आज (३० सप्टेंबर) ३२ वर्षे पूर्ण झाले आहेत. भूकंपाच्या थरकाप उडवणाऱ्या आठवणी आजही जुने लोक सांगतात. नेमक्या आजच्याच दिवशी कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत.
मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. धरणाच्या पूर्वेकडील परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्याच्या तीव्रता साधारण २ रिक्टर स्केल असण्याची शक्यता आहे.