ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट | Kranti Redkar Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kranti Redkar
ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट

ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या कारवाईनंतर राज्यात एका वेगळ्या वादाला सुरूवात झाली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर आणि झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केलेत. त्यानंतर हे प्रकरण समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याभोवती फिरत होतं. यावरून वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने (Kranti Redkar) अनेकदा त्यांची पाठराखण केली. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट (Kranti Redkar Tweet) करत एनसीबीची पाठ थोपटली आहे.

हेही वाचा: रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप

अभिनेत्री क्रांती रेडकरने अनेकदा आपले पती समीर वानखेडे हे निर्दोष असून, त्यांना अडकवण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर क्रांती असंही म्हणाली होती की कितीही दबाव टाकला तरी एनसीबी आपलं काम करत राहील. त्यानंतर आज एनसीबीने जळगावच्या एरंडोलजवळ केलेल्या एका कारवाईवरून एनबीबीची पाठ थोपटली. क्रांतीने "ना रुकेंगे ना थमेंगे" म्हणत एनसीबीच्या एका मोठ्या कारवाईचे वृत्त शेअर केले आहे. नवाब मलिकांनी आता पर्यंत वेगवेळ्या पत्रकार परिषदा घेत प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. क्रांतीच्या या ट्विटमुळे हा वाद पुन्हा उफाळणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप

दरम्यान, मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली असून, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा विशाखापट्टणम येथून आणण्यात आला असून, या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे ड्रग्ज कुठे घेऊन जात होते याची माहिती एनसीबी घेत आहे. क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये हेच वृत्त शेअर केले आहेत.

loading image
go to top