रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane
रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप

रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप

राज्यात १२ नोव्हेबंरला नांदेड, मालेगाव अमरावतीसारख्या काही ठिकाणी मुस्लीम समाजाने मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये झालेल्या एका कथित घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागलं होतं. यावरून आता सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सूरू आहेत. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे यांनी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसचारावरून काही खळबळजनक दावे केले आहेत.

रझा अकादमीवर गंभीर आरोप करताना नितेश राणे यांनी काही भित्तीपत्रकं दाखवली. यावर त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाला येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यावरून नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला की, रझा अॅकॅडमीच्या लोकांनी मला फक्त एक फोटो दाखवा ज्यामध्ये हिंदूंनी तोडलेली मस्जित दिसतेय. ज्या गोष्टीमुळे तुम्ही हिंदू लोकांना जाऊन मुस्लीम समाजाची माथी भडकावताय, ती गोष्ट झालीच नव्हती असं सांगितलं. तसंच राज्य सरकार यांच्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महापौरांसह तिघांना अटक

रझा अकादमीने हिंदूंना का मारलं? पोलिसांवर दगडफेक का केली? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र सरकारने त्यांना प्रश्न का विचारला नाही असंही ते म्हणाले. रझा अकादमी ही अतिरेकी संघटना असून, ते अतिरेकी संघटनांसारखी काम करते. रझा अकादमीचा संस्थापक तालिबानचा आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असंही ते म्हणाले.

loading image
go to top