
आता भाजपामध्ये राजकीय घडोमोडींच्या हलाचालींना सुरुवात झाली आहे.
कृपाशंकर यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. आपआपल्या परीने प्रत्येक पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणीला आणि पक्ष वाढवण्यासाठी सुरवात केली आहे. अगामी महापालिका निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात अनेक बदल पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता भाजपामध्ये राजकीय घडोमोडींच्या हलाचालींना सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्याकडून कृपा शंकर सिंह यांची भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा: खासदार राऊत विकासकामांच्या नावे खोटी पत्र देतात, राणेंचा हल्लाबोल
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर सिंह यांच्यावर भाजपाने जबाबादीर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या नियुक्तीपत्रातून चंद्रकांत पाटील म्हणाले की, कृपा शंकर सिंह जी तुम्ही मागील अनेक वर्षांपासून उत्तर भारतात अनेक महत्वाची आणि जबाबदारीची कामे केली आहेत. उत्तर भारतीय जनतेमध्ये तुमचा जनसंपर्क अधिक असल्याने हा कार्यभार सोपवत आहोत. संघटन कौशल्य आणि भारतीय अस्मितेसंदर्भात आम्ही जाणून आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर भारतीय जनतेला भाजपा सोबत बांधण्यासाठी या सर्वांचा उपयोग होईल हे निश्चित आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महापालिकेच्या अनुषंगाने आता भाजपाने राज्याच्या राजकारणात निवडणुकींसाठी कंबर कसली असल्याचे चित्र असल्याने इतर पक्ष आता यावर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपा कडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असल्याने सत्ताधाऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा: 'सोमय्यांना पश्चिम बंगालमधील कंपनीकडून पैसे', राऊतांच्या ट्विटने खळबळ
Web Title: Kripa Shankar Singh Appoints In Charge Of Bjp North Indian Morcha In Maharashtra Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..