सरकारनं समजूतदारपणा दाखवला - राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं

सरकारनं समजूतदारपणा दाखवला - राजू शेट्टी

कोल्हापूर - देशाच्या संसदेत तुम्हाला बहुमतं असलं तरीही आम्हाला कृषी कायदा मान्य नाही, शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा विजय झाला आहे. हा एक ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे. आज कृषी कायदे मागे घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केलं आहे. या निर्णयावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

हेही वाचा: तीन कृषी कायदे मागे घेणार - पंतप्रधान मोदी

यासंबंधित राजू शेट्टी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, येत्या २५ तारखेला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत होतं. जवळपास वर्षभर चालू असणाऱ्या हे आंदोलन शेतकऱ्यांनी शांतता आणि सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू केलं. देशाच्या संसदेत तुम्हाला बहुमतं असलं तरीसुद्धा आम्हाला हा कायदा मान्य नाही, या भूमिकेमुळे हा निर्णय मागे घेतला आहे. आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे.

पुढे ते म्हणाले, मी सरकारचं अभिनंदन करतो. उशिरा का होईना त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांची इच्छा आणि मागणी याचा विचार केला. कारण आंदोलन म्हणजे युद्ध नाही. परंतु एक सत्याची मागणी सत्याग्रहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मांडली आणि त्याला यश मिळालं आहे. उशिरा का होईना सरकारने समजूतदारपणा दाखवला त्याबद्दल मी पंतप्रधान आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करतो.

हेही वाचा: आमच्या तपस्येत उणीव, कोणाला दोष देण्यात अर्थ नाही - PM मोदी

loading image
go to top