

Dr. Baba Adhav
esakal
पुणे: महाराष्ट्रासह देशातील कष्टकऱ्यांचा श्वासात मिसळलेला, त्यांना न्याय्य हक्कांसाठी उभं राहण्याची ताकद देणारा, उपेक्षितांचे दु:ख स्वत:चे मानून त्यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा बुलंद आवाज सोमवारी रात्री काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्राच्या श्रमिक चळवळीचा कणा असलेले...अन् कामगार, हमाल, माथाडी, कष्टकरी अशा असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि नेते डॉ. बाबा आढाव (वय ९६) यांची खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला.