Ladki Bahin Yojana August installment ₹1500 payment status check online
esakal
Ladki Bahin Yojana August Installment Update : आता सप्टेंबर महिना संपत आला तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Ladki Bahin Yojana Payment Status) होते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रलंबित असल्याने यावेळी खात्यात १,५०० रुपये जमा होणार की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून ३,००० रुपये मिळणार, याकडे महिलांचे लक्ष लागले होते. मात्र, आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीये.