
मुंबई : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीकडे डोळे ठेवून घोषित केली असून, ती गुंडाळण्याचे आदेश सरकार मागील दाराने देणार आहे, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या कमी न होता वाढली आहे. निवडणुकीपूर्वी लाभार्थी बहिणींची संख्या दोन कोटी ४७ लाख होती ; आता निवडणुकीनंतर ही संख्या पाच लाखांनी वाढून दोन कोटी ५२ लाखांवर पोचली आहे.