
महाराष्ट्र सरकारच्या 'माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने तब्बल ५ लाख महिलांची नावे अपात्र ठरवून लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली आहेत. परिणामी, या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी होती, जी आता २.४१ कोटीवर आली आहे.