
सरकारी योजनांचा उद्देश हा सामन्य नागरिकांना दिलासा देणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे हा असतो. मात्र कधीकधी काही योजना या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरतात. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अशीच एक योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अडचणीची ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. या योजनेशी संबंधीत बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी ही योजना धोकादायक असल्याचे सांगत आंदोलनाचे हत्यार उपसले. अखेर सरकार आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते कामावर परत आले आहेत.