

Ladki Bahin Scheme news
esakal
मुंबई, ता. १२ : ‘लाडकी बहीण’ योजनेतील दोन महिन्यांची (डिसेंबर आणि जानेवारीची अग्रिम) रक्कम महिलांच्या खात्यांत मतदानाच्या चोवीस तास आधी जमा करण्याच्या महायुती सरकारच्या प्रयत्नांना राज्य निवडणूक आयोगाने अर्धवट आळा घातला आहे. या योजनेचा नियमित हप्ताच देण्याची परवानगी आयोगाकडून देण्यात आली आहे, मात्र जानेवारी माहिन्याचा आगाऊ हप्ता देण्यापासून निवडणूक आयोगाने राज्य सरकारला रोखले आहे.