

Ladki Bahin Yojana Update: Will Women Receive ₹3000 Together as February Installment Gets Delayed?
esakal
Ladki Bahin Yojana Installment: मार्च महिन्याच्या पहिल्या दशकात प्रवेश केला तरी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. फेब्रुवारी संपल्यानंतर मार्चचे दहा दिवस उलटले तरी त्यांच्या बँक खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरमहा १५०० रुपयांच्या हप्त्यावर अवलंबून असलेल्या या महिलांना आता पैसे कधी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.