

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावित केलेल्या ३,६९० कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या निधीतून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, "लाभार्थींना वेळेत हप्ता मिळणे ही आमची प्राथमिकता आहे."