
महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. जून-जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी निधीची कमतरता दूर करत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू केले आहे. यासोबतच, योजनेत अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रियाही राबवली जात आहे.