

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आर्थिक भार वाढवत असल्याने, सरकारने इतर मोफत योजनांवर कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जवळपास १ लाख कोटी रुपयांची बचत करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे समजते. या निर्णयामुळे राज्यातील अनेक गरीब आणि गरजू लोकांवर मोठा परिणाम होऊ शकतो. साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.