
सोलापूर - महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला.