.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई - ‘लाडकी बहीण योजने’च्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वत:हून पुढे येत असून आतापर्यंत अनेक लाभार्थींनी स्वत:हून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.