

Angry beneficiaries of the Ladki Bahin Yojana block the Mumbai–Kolkata Highway at Nagpur Naka in Bhandara, protesting delayed November and December payments.
esakal
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे; मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. दरम्यान आज भंडाऱ्यात लाडक्या बहिणींचा संताप पाहायला मिळाला. संतप्त लाडक्या बहिणींनी शनिवारी सकाळी मुंबई-कोलकाता महामार्ग अडवला. यामुळे काही वेळ वाहतुक कोंडी झाली अन् वाहनांचा रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.