
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत मोठी चूक उघडकीस आली आहे. या योजनेतून तब्बल ९,५२६ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण निवृत्तीवेतन किंवा नियमित पगार घेत असताना देखील योजनेचे १,५०० रुपये महिन्याला त्यांच्या खात्यात जमा होत होते. यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.