esakal | राज्यातील भाजप नेते ‘लखीमपूर’वर गप्प का?काँग्रेस सचिव बरगे यांचा सवाल | Lakhimpur Incident
sakal

बोलून बातमी शोधा

Shrirang barge

राज्यातील भाजप नेते ‘लखीमपूर’वर गप्प का?काँग्रेस सचिव बरगे यांचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत (Farmers problem) कळवळा दाखवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये (BJP leaders) चढाओढ सुरू असते; मात्र राज्यातील भाजप नेते लखीमपूर हत्याकांडावर (lakhimpur incident) गप्प का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे (shrirang barge) यांनी विचारला आहे.

हेही वाचा: मुंबई: फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली; महिलेला त्रास देणाऱ्याला अटक

भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती समृद्ध करण्यात शेतकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती; परंतु ११ महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही.

लखीमपूर घटनेत मुख्य आरोपी केंद्रीय राज्यमंत्र्याचा मुलगा याला अटक होत नाही? लखीमपूर येथील घटनेने देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अमानुष आणि लज्जास्पद कृत्य भारताच्या सुसंस्कृत परंपरेला डाग आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची अटक दुर्दैवी असून, या संपूर्ण घटनेमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

loading image
go to top