esakal | मुंबई: फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली; महिलेला त्रास देणाऱ्याला अटक | Facebook
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई: फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली; महिलेला त्रास देणाऱ्याला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : फेसबुकवर (Facebook) ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (friend request) नाकारली म्हणून एका महिलेचे मानसिक शोषण (mentally harassment) करून तिच्या मोबाईलवर अश्‍लील संदेश, छायाचित्र (Abusive pictures) पाठवून विनयभंग करणाऱ्याला छत्तीसगड येथून मलबार हिल पोलिसांनी अटक (culprit arrested) केली. सुमितकुमार सुरेश सिंग (वय २४) असे आरोपीचे नाव असून, स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

हेही वाचा: कंत्राट मिळविण्याच्या वादातून सीवूड्समध्ये तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल

तक्रारदार महिला मलबार हिल परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून, फेसबुकवर तिचे स्वतःचे एक खाते आहे. जूनमध्ये तिला सुमितसिंग नावाच्या एका तरुणाची रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली नव्हती. त्याचा राग आल्याने त्याने तिला काही अश्‍लील संदेश, छायाचित्रे पाठवून मानसिक त्रास दिला. याबाबत त्याला समजही दिली. तरीही तो थांबला नाही. त्यामुळे २५ जूनला तिने मलबार हिल पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या पथकाने छत्तीसगड येथून सुमितकुमार सिंग याला ताब्यात घेतले.

loading image
go to top