Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला ‘लालबागचा राजा’; मोठी मदत पाठवणार

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi LandslideEsakal
Updated on

Raigad Landslide Update : कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यादरम्यान रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाल्याचा प्रकार समोर आला. या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप १०० ते १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सततचा पाऊस आणि खराब हवामानामुखे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आलं आहे.

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Landslide Rescue Operation: इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरूवात! 16 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती

लालबागचा राजा धावून आला

या संकटाच्या काळात इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आले आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंची मदत मंडळाकडून करण्यात येणार आहे.

Khalapur Irshalwadi Landslide
Kirit Somaiya News : विरोधकांच्या रडारवर असलेले सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची घेतली भेट

शुक्रवारी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना केली जाणार आहे. दरम्यान इर्शाळवाड येथे सध्या एनडीआरएफच्या बचाव पथकासोबत पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गटही मदतकार्य करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers
Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends
Mumbai Goa Highway Fire
traffic jam Mumbai to Goa highway weekend
Marathi News Esakal
www.esakal.com