ऐका ऐका हो... लालपरीची कथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Durgesh Kale

ऐका ऐका हो... लालपरीची कथा

राज्यभर एसटी कामगारांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा एसटी कामगारांनी घेतला आहे. पण राज्य सरकार या कामगारांच्या मागण्या काही केल्या पूर्ण करेल असं दिसत नाही. या आंदोलनात कित्येक एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आणि त्यांचे संसार उघड्यावर आले तरीही सरकारला जाग येत नाही. अशी बिकट अवस्था महाराष्ट्रात एसटीची झाली आहे. नेमकं एसटीवर अशी वेळ का आली आणि एसटीने आपल्याला काय दिले? या विषयावर रत्नदिप शिंदे या तरूणाने लालपरीच्या व्यथा आपल्या कवितेतून मांडल्या आहेत. तसेच दुर्गेश काळे यांनी ही कविता गायली आहे.

या कवितेची इंस्टाग्राम लिंक खाली दिली आहे.

या कवितेतून रात्रंदिवस महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या एसटीच्या चालक आणि वाहकाची कथा मांडली आहे. ग्रामीण भागातील काट्याकुट्यांचे आणि खड्ड्यांचे रस्ते तुडवित गाव-शहरांना जोडण्याचं मोलाचं काम लालपरी आत्तापर्यंत करत आली आहे. लालपरीमुळे कित्येक गरीबांचे प्रवास सुखकर झाले आहेत. आत्तापर्यंत कधी एसटीचा भार सरकारला वाटला नाही पण आता कामगारांचे पगार वेळेवर का होत नाहीत? ज्या कामगारांनी आणि लालपरीने गावांची आणि शहरांची नाळ जोडून ठेवली त्यांची व्यथा या कवितेतून मांडली आहे.

loading image
go to top