इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात मोठी गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल

आयोजक मनसे नेते सुमंत धस यांच्यावर गुन्हा दाखल
Indurikar-Maharaj
Indurikar-Maharaj
Updated on

केज : इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या किर्तनात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानं आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या केज इथं मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस (Sumant Dhas) यांनी काल या किर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Large crowd in Indurikar Maharaj kirtan Filed FIR against organizer Sumant Dhas)

Indurikar-Maharaj
परमबीर सिंग यांची चौकशी टळली; ACB नं दिला दोन आठवड्यांचा वेळ

सूत्रांच्या माहितीनुसार, बीडच्या नांदुरघाट इथं इंदुरीकर महाराज यांच्या कर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. कोविडचे सर्व नियम इथं मोडण्यात आले म्हणून सोहळ्याचे आयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्याविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Indurikar-Maharaj
सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!

या कार्यक्रमात सुमारे एक हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यात आलं नव्हतं. या ठिकाणी कोणाच्या तोंडाला मास्कही लावण्यात आला नव्हता, अशा परिस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Indurikar-Maharaj
अभिमानास्पद! महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज

दरम्यान, सुमंत धस यांनी या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे. जर प्रचार सभांना गर्दी होत असेल तर आमच्या धार्मिक कार्यक्रमांना का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com