कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारा अलौकिक स्वर हरपला - शरद पवार

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
latadidi
latadidiesakal
Updated on
Summary

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.

देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान, मनोरंजन, कलेसह विविध क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (sharad pawar tribute to latadidi)

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ट्वीटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशी भावनिक पोस्ट करत त्यांनी आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. त्यांच्या जाण्याने कला आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com