'कसा आहेस देवेंद्र? मोठ्या बहिणीचे शब्द...' फडणवीस भावूक

Devendra Fadnavis Tribute to Lata Didi
Devendra Fadnavis Tribute to Lata DidiDevendra Fadnavis Twitter
Updated on

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झालं. त्यांच्या जाण्यानं फक्त स्वर नाहीतर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही ही कल्पना करवत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) श्रद्धांजली वाहिली.

Devendra Fadnavis Tribute to Lata Didi
Lata Mangeshkar: 'मेरा साया साथ होगा': गानसरस्वती लता दीदींचे निधन

‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच! ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे, असं फडणवीस म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे, असे म्हणत फडणवीस भावूक झालेत.

लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील.भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com