Latest Marathi News Live Update : विशाळगडावर मांस नेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
Kolhapur Live Update: विशाळगडावर मांस घेऊन जाण्यास बंदी असतानाही आदेशाचा भंग करून मांस घेऊन गडावर जात असताना अजिम मजिद मुजावर (वय २९) व रज्जाक मजिद मुजावर (वय ३१) (दोघे रा. विशाळगड) हे गडाच्या पायथ्याला सापडले. त्यांच्याकडे ८ हजार रुपये किमतीचे मांस मिळाले. हिंदुत्ववादी पर्यटकांनी त्यांना शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला.
कोल्हापूर येथील पाच पर्यटक गड पाहण्यासाठी विशाळगडावर निघाले होते. गडावर जाण्याची वेळ संपल्याने त्यांना सोडता आले नाही.याच दरम्यान अजिम मुजावर व रज्जाक मुजावर हे दोघे प्लास्टिक पिशव्यांमधून काहीतरी संशयस्पदरित्या घेऊन गडावर जात असल्याचे पर्यटकांच्या निदर्शनास आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता मांस आढळले. अजिम व रज्जाक यांना पर्यटकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.