

MPSC Recruitment 2026: 11,000 More Posts Likely in Group C Exams; One-Year Age Relaxation Recommended
eSakal
MPSC Group C latest vacancy update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPSC करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. राज्यातील शासकीय स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि कॉपीसारखे प्रकार रोखून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अंतरिम अहवाल सादर केला आहे. यात समितीने MPSC गट-क परीक्षेच्या जागा वाढविण्याचीदेखील शिफारस केली आहे.