
Latur Latest News: उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) या विषाणूजन्य आजाराने (बर्ड फ्ल्यू ) झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे.
यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.