Latur Accident : लातूरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात, चार मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; पार्टीकरून परतत असताना काळाचा घाला!

Latur latest News : कारेपूर गावातील अजीम पाशामिया शेख याची पोलीस भरतीत निवड झाली होती. याचाच आनंद साजरा करण्यासाठी सहाही मित्र सोमवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते.
Accident
Accidentesakal
Updated on

Latur Four Friend Death In Car Accident : लातूरमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात चार मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सहाही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे रहिवासी होते. मित्राची पोलीस भरतीत निवड झाल्याने ते पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी करून घरी परतताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या घटनेनंतर आता कारेपूर गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com