
उदगीर : लातूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. जन्मदात्या बापानेच त्याच्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. चिमुकलीने चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितल्याचा रागात जन्मदात्याने मुलीचा गळा आवळून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.