Latur News: अन् वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपलं औताला...; लातूरमधील शेतकऱ्याची व्यथा!

Latur Farmer Ploughs Field Himself : अंबादास पवार याचं शरीर आता पूर्णपणे थकलं आहे. पण तरीही ते कष्ट करून स्वत:च्या कुटुंबाचा उदर्निवाह करत आहेत.
Latur Farmer Ploughs Field Himself
Latur Farmer Ploughs Field Himselfesakal
Updated on

65-Year-Old Farmer from Latur Ties Himself to Plough : शेतीचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला औताला झुंपवून घेतले आहे. अंबादास गोविंद पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते अशाप्रकारे शेती करत आहेत. एकीकडे आपण भारत कृषीप्रधान देश असल्याचं म्हणतो आहे, पण खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्यावर बैलाऐवजी स्वत:ला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. या घटनेनं शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com