

Congress leaders celebrate as the Congress–Vanchit Bahujan Aghadi alliance secures majority in the Latur Municipal Corporation election, signaling a major political shift in the city.
esakal
लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने जबरदस्त मुसंडी मारली आहे. मतमोजणीनंतर उपलब्ध माहितीनुसार, काँग्रेस-वंचित आघाडीने ३७ जागा जिंकल्या असून, बहुमताचा आकडा (३६) ओलांडला आहे. यामुळे लातूर महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, भाजपला फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.