

Rules for Lavani and Folk Art
Esakal
लावणी आणि लोककलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील डान्सला आता चाप लागणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लावणी आणि लोककला सादर करणाऱ्यांना सरकारच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. नृत्यप्रकारात अश्लील कृत्य नसल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कार्यक्रमाला परवानगी मिळणार आहे. राज्यात कार्यक्रम करण्याआधी आयोजकांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र पोलिसांसमोर सादर करावं लागेल. त्यानंतरच कार्यक्रमाला परवानगी मिळेल.