''नवनीत राणांच्या जीवाला काही झालं तर...'', वकिलांचं तुरुंग अधिक्षकांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet  Rana

''नवनीत राणांच्या जीवाला काही झालं तर...'', वकिलांचं तुरुंग अधिक्षकांना पत्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्यासाठी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) मुंबईत आले होते. त्यावेळी झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. सध्या दोघेही भायखळ्याच्या तुरुंगात असून वकिलांनी नवनीत राणांच्या तब्येतीबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा: मंत्रिपदासाठी स्टंट ! तृप्ती देसाई यांची नवनीत राणा यांच्यावर टीका

आमच्या क्लायंटला म्हणजेच नवनीत राणांना स्पॉन्डिलायसीसचा आजार आहे. त्यांना तुरुंगात जमिनीवर बसायला आणि झोपायला लावले. त्यामुळे हा आजार अधिक बळावला आहे. डॉक्टरांनी लेखी देऊनही त्यांच्या सीटी स्कॅनच्या विनंतीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना काही झाले तर तुरुंग अधिकारी जबाबदार असेल, असं पत्र खासदार नवनीत राणांच्या वकिलांनी भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे.

राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी फक्त जामीनच नाहीतर तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देखील नवनीत राणांनी विनंती केली होती. त्यावर सुनावणी झाली. पण, न्यायालय आज त्यावर निकाल देणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची पुन्हा तुरुंगात रवानगी होते, की त्यांना जामीन मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी अमरावतीत अंबादेवीची आरती केली. तसेच घरात भजन-किर्तनाचं आयोजन केलं होतं. नवनीत राणांची मुलगी आरोह राणा हीने देखील माझ्या आई-वडिलांची लवकर सुटका कर, असं म्हणत देवाला साकडे घातले होते.

Web Title: Lawyer Letter To Jail Superitendent Regarding Navneet Rana Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :navneet ranaRavi Rana
go to top