पराभवाची जबाबदारी नेतृत्वाने स्वीकारावी : खडसे

Leader should accept responsibility of defeat Said Eknath Khadse.jpg
Leader should accept responsibility of defeat Said Eknath Khadse.jpg

मुंबई : "भाजपच्या आजच्या स्थितीला नेतृत्वच जबाबदार असून त्यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,'' अशा शब्दांत खडसे यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले. भारतीय जनता पक्षावर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीने डोके वर काढले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराजांना एकत्र आणून फडणवीसांच्या नेतृत्वाविरोधात आज आवाज उठवला. 

"विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला. त्यासाठी कार्यकर्त्यांना हाताशी धरले गेले होते. पक्षातील बहुजन आणि ओबीसी नेते निवडणुकीत पराभूत झाले. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना निवडणुकीत तिकीट दिले नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम केले असते पक्षाच्या जागा वाढल्या असत्या,'' असे सांगत खडसे यांनी निवडणुकीतील अपयशाचे खापर फडणवीस यांच्यावर फोडले. 

महत्वाचे: फिक्स्ड डिपॉझीटमध्ये गुंतवणूक का करावी? 

भाजपमध्ये फडणवीस यांच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. माजी ग्रमविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकून आपल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली. पंकजा या 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ खडसे, विनोद तावडे, राम शिंदे यांनी आज मुंडे यांची भेट घेतली. यानिमित्ताने भाजपमधील नाराजांचा गट फडणवीस यांच्या विरोधात उभा राहताना दिसत आहे. 

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''

कारवाई व्हावी 
पंकजा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी फडणवीस यांच्यावर नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. ""आजच्या भेटीत रोहिणी खडसेचा पराभव का झाला? या पराभवाला कोण जबाबदार आहे? याची माहिती मी दिली. तर पंकजा यांनीही त्यांच्या पराभवाबद्दलची माहिती दिली. ज्यांनी विरोधात काम केले त्यांची नावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहेत. येत्या 7 डिसेंबरला प्रदेशाध्यक्ष जळगावला येत आहेत. त्यावेळी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे. पक्षात जे घडत आहे त्याबद्दल अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता वरिष्ठांच्या कानावर घातली आहे,'' असे खडसे म्हणाले.

अखेर नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com