esakal | आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

लर्निंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने मिळवण्यासाठीच्या सेवेचा अनावरण सोहळा आज पार पडला. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्चुअल पद्धतीने संवाद साधला.

आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- लर्निंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने मिळवण्यासाठीच्या सेवेचा अनावरण सोहळा आज पार पडला. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्चुअल पद्धतीने संवाद साधला. आरटीओ विभाग आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार आहे. या निर्णयामुळे घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळणे शक्य झालं आहे. या माध्यमातून लर्निंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे लोकांच्या आरटीओ कार्यालयात होणाऱ्या फेऱ्या कमी होणार आहेत. (learning driving licence online test rto cm uddhav thackeray)

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आताच्या गाड्या गिअरच्या आहेत. याआधीच्या गाड्यांना तीन पॅडेल असायचे. तसेच हँड गिअर असायचे. त्यावेळी मी जीप चालवायचो. ड्रायव्हिंग टेस्टवेळी हमखास नापास होणं नक्की होतं. कारण, लायसेन्स मिळवताना चढावरती गाडी थांबवून दाखवायची आणि पुन्हा ती चढवून दाखवावं लागायचं. ती कठीण परीक्षा होती. पण, परीक्षेची काढीण्य पातळी कमी करु नये. पण, ते मिळवण्यासाठी सुविधा सोपी केली जावी.

हेही वाचा: 'तुम्ही खुनी आहात का?'; पत्रकाराचा पुतिन यांना थेट प्रश्न

आपल्या राज्यात दरवर्षी 15 लाख शिकावू लायसेन्स दिले जातात. 20 लाख वाहनांची नोंदणी केली जाते. इतक्या मोठ्या संस्खेने वाहने रस्त्यावर उतरताहेत. वाहणं वाढताहेत, पण रस्त्याची रुंदी वाढू शकत नाही. पार्किंगची समस्या शहरांमध्ये जाणवत आहे. त्याची व्यवस्था करायला पाहिजे. या नव्या सुविधेमुळे200 अधिकाऱ्यांचा ताण कमी होईल. कारण नसताना ताण घेऊन काम केल्याने कामाचा दर्जा खालावतो. विभागाने चांगलं पाऊल उचललं आहे. जगभरातील चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात, मुंबईत पाहिजेतच. महाराष्ट्र विकासात अग्रसेर राज्य आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

loading image