सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती; चुरशीच्या निवडणुकीचे संकेत : Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil

सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांचा उत्‍साहही वाढला आहे.

सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती; चुरशीच्या निवडणुकीचे संकेत

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधात तगडा उमदेवार देण्याची तयारी भाजपने केली आहे. दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा होणार असल्याने सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांचा उत्‍साहही वाढला आहे. विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर लगेचच जिल्‍हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत मिळणाऱ्या थैल्या जिल्‍हा परिषद निवडणुकीत खर्च करण्यास मिळतील, या अपेक्षेने सदस्यांचा उत्‍साह वाढला आहे. दरम्यान जिल्‍हा परिषद पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री पाटील यांच्या प्रचारासाठी दौरे सुरू झाले आहेत.

१० डिसेंबरला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील रिंगणात असणार आहेत. गुरुवारी (ता. ११) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्‍थितीत बैठक होणार असून यात उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी तगडा उमेदवार देण्याची घोषणा केल्याने सदस्यांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे. महिनाभरात जिल्‍हा परिषद निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीला विधान परिषद निवडणुकीचा कसा फायदा होईल, याची चर्चा जिल्‍हा परिषद सदस्यांमध्ये सुरू आहे. जिल्‍हा परिषदेचे ६५ सदस्य विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत. यातील कोणता सदस्य कोणाला मतदान करेल इथंपासून ते एका मताची बोली किती लागेल, यावर चर्चा झडू लागली आहे.

हेही वाचा: जिल्हा बॅंकेत 'या' दोन भाऊंची एन्ट्री होणार काय ? जो मजबूत, तो टिकेल

पदाधिकारी दौऱ्यावर

पदाधिकारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. अध्यक्ष राहुल पाटील हे आज (ता. ११) तीन तालुक्यांचा दौरा करणार आहेत. करवीर पंचायत समितीचे पदाधिकारीही सदस्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर जिल्‍हा परिषदेतील राजकारणाला चांगलीच रंगत येणार आहे.

loading image
go to top